आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम प्रणालीची गरज असते.ती म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती. काही व्यक्तींमध्ये जन्मताच रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा व्यक्तींना आजाराची लागण पटकन होते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार आणि विहारात बदल करणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती ही प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची डिफेन्स सिस्टिम आहे. जर शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे आहे. यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
आहार
१)शरीरास वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून वाचविण्यासाठी विटामिन- सी अत्यंत फायदेशीर असते. नेहमीच आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेले लिंबू ,आवळा आणि संत्री विटामिन- सी चे भंडार आहे. त्यामुळे त्यांचे नियमित सेवन करा.
२) इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी ड्रायफ्रुट उपयोगी ठरतात. कारण यामध्ये इम्युनिटी सिस्टीम मजबूत करणारे पोषक घटक असतात. यामध्ये फायबर , आयरन, झिंक आणि मिनरल्स असतात.

विहार
१) रोज पर्याप्त झोप घ्यावी. कारण झोप शरीराची गरज आहे
२) रोज सकाळी लवकर उठावे. आणि किमान अर्धा तास तरी योगासने करावीत.
३) प्राणायाम करता आल्यास उत्तम त्यामुळे आपला शोषण प्रणाली ला ताकद मिळते.
४) किमान सकाळी अर्धा तास सूर्यप्रकाश घ्यावा. सकाळच्या उन्हामधे अतिनील किरण (U.V. Light) असतात. त्यामुळे विटामिन -डी बनण्यास मदत होते. यामुळे आपली हाडे मजबूत होतात
५) एयर कंडीशन (A.C)चा वापर करू नये. खिडक्या उघड्या ठेवाव्यात म्हणजे शुद्ध हवेचा संचार होत राहील.
६) धूम्रपान व मद्यपान करू नये.
७) जेवल्यानंतर लगेच झोपू नये. शतपावली करावी आणि संध्याकाळी लवकर जेवावे आणि कमी प्रमाणात जेवावे.
८) लिफ्टचा वापर करू नये. जिन्याचा वापर करावा.
९) बादाम मध्ये विटामिन -ए जास्त असते. दररोज आठ ते दहा बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
१०) आहारात कच्च्या पालेभाज्यांचा समावेश असू द्यावा आणि विशेषता हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाव्या.
११) आहारामध्ये मैदा वर्ज करावा आणि बेकरी प्रॉडक्ट्स खाणे टाळावे.
१२) अति प्रमाणात साखर असलेल्या पदार्थांचे सेवन करू नये.
१३) तळलेले व बाहेरचे मसालेदार असलेले पदार्थ खाणे टाळावे.
१४) खूप थंड पाणी पिऊ नये (विशेषतः फ्रिजमधील). माठातले पाणी प्यावे. उकळून थंड केलेले पाणी पिल्यास उत्तम.
१५) तीळ, जवस, शेंगदाणे,मेथीमेथी अशा पदार्थांमध्ये प्राकृतिक तेल असते. यामुळे आपल्या संधींना (Joints) वंगण
मिळते. तसेच यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड (Omega-3 fatty acids) असतात जे एंटीऑक्सीडेंट आहेत.